GBS Cases Updates: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काही भागात जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा संसर्ग वाढत आहे. आता या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनावर भर दिला जात आहे. सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने पुणे महापालिका अधिकाऱ्यांसह प्रार्दुभाव झालेल्या भागाची पाहणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यात एका जीबीएस आजाराच्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आजाराचा संसर्ग वाढत चालला असून, रुग्णांची संख्याही १०१ वर पोहोचली आहे. यापैकी १६ रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
जागतिक आरोग्य संघटनेकडून पाहणी
पुण्यात अचानक जीबीएस आजाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येऊ लागले. त्यामुळे प्रशासनाने उपाय योजना हाती घेतल्या आहेत. आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात असली, तरी आजाराचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने पुण्यात पाहणी केली.
पुण्यातील नांदेड गावात जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने महापालिका अधिकाऱ्यांसह परिसरात फिरून पाहती घेतली.
WHO च्या अधिकाऱ्यांकडून पाहणी, व्हिडीओ पहा
पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू
पुण्यातील धायरी भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय रुग्णाचा जीबीएस आजाराने मृत्यू झाला. जीबीएसचा संसर्ग झाल्यानंतर हा रुग्ण सोलापुरातील एका रुग्णालयात भरती झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुण्यात जीबीएस आजाराच्या संक्रमणाचा वेग वाढला असून, एकाच दिवसात २८ रुग्ण आढळून आले. ५० ते ८० वयोगटातील २३ लोकांना याचा संसर्ग झाला असून, रुग्णांमध्ये १९ मुलांचाही समावेश आहे.