पुणे : नभरंग प्रतिष्ठानर्फे आयोजित ऑनलाइन गीतरामायण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, उद्या (दि.२१) रात्री ९ वाजता रामनवमीला या उपक्रमाचा समारोप होणार आहे. यावेळी गीतरामायण निवेदिका सुकन्या जोशी रसिकांशी संवाद साधणार आहेत.
सध्याच्या नकारात्मक वातावरणात गीतरामायणाच्या माध्यमातून श्रवणीयतेचा सुखद आनंद रसिकांना मिळत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्यापासून या उपक्रमास प्रारंभ झाला. दररोज सायंकाळी रसिकांना गीतरामायण ऐकण्याची सुश्राव्य अनुभूती मिळत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्रीपाद पदे यांची असून, प्रवीण रायबागकर, प्रसाद पालव, वैशाली घाडगे, स्वाती देशपांडे, उषा जोशी, अमिता लेकुरवाळे, उल्हास सावजी, अनुराधा पिंगळीकर, पल्लवी प्रसन्न, सुषमा थिटे असे महाराष्ट्राच्या विविध शहरातील कलाकार या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी रहाटकर म्हणाल्या, आज ६५ वर्षांनंतरही गीत रामायणाची गोडी अविट असून, सरस्वतीच्या मंदिरातील मांगल्य आणि चैतन्यदायी प्रसन्नता असलेला जणू हा एक नंदादीप आहे.
-----------------------------------------