जेजुरी : येथील औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीच्या 14क् कायम कामगारांचे सोमवारी सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. आज कामगारांच्या कुटुंबीयांनी घरातील आबालवृद्धांसह आंदोलनात सहभाग घेतला. तसेच याच कंपनीतील इतर कामगारांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, कंपनीचे महाव्यवस्थापक सुनील खेडकर कंपनीत जात असताना त्यांची गाडी कामगारांनी अडवली.
बैठकीला पुणो जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा
बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे,
ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे, जि.प. सदस्य विराज काकडे, माणिक ङोंडे-पाटील, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर, शिवसेनेचे मुरलीधर काळाने, महेश स्वामी, काँग्रेसचे
गणोश जगताप, संभाजी ब्रिगेडचे लोकेश सावंत, संदीप जगताप, कंपनीचे महाव्यवस्थापक सुनील खेडकर, उपमहाव्यवस्थापक कैलास आवटे, स.पो.नि. रामदास
शेळके, सासवडचे पोलीस निरीक्षक सदानंद गौड उपस्थित होते.
26 तारखेपयर्ंत शांततेत आंदोलन
सुरू राहील, असे किशोर कामथे, संदीप खेंगरे, नीलकंठ गाडेकर, विजय बनकर, अशोक कामथे यांनी सांगितले.(वार्ताहर)
4आंदोलक आणि व्यवस्थापनातील कर्मचारी समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सामाजिक कार्यकर्ते बापू भोर आणि पोलीस कर्मचा:यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी आंदोलक महिला व कामगारांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तालुक्यातील सर्वपक्षीय
नेते, विविध संघटनांचे प्रतिनिधी जेजुरी पोलीस ठाण्यात आले होते.
या संदर्भात पोलीस ठाण्यातच एक बैठक झाली.