जिल्ह्यात सुरू असलेल्या बेशिस्त वाहतुकीला आता आळा बसणार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक जय जाधव यांनी धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, तशी धडक कारवाई सुरू झाली आहे. ही मोहीम पुढील तीन दिवस सुरू राहणार असून, आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असणार आहे. जुन्नर : ४ जून रोजी लोकमतमध्ये ‘बेशिस्त वाहतुकीला धडा’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची पुणे ग्रामीण अधीक्षक यांनी दखल घेत पुणे ग्रामीण मधील इतर पोलीस स्टेशनच्या आधिकारी यांना बेशिस्त वाहतूकीस धडा शिकवण्याचे आदेश दिले आहेत. जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज एकोणीस वाहनांवर कारवाई करण्यात आली. जुन्नर शहरात सर्वत्र वाहतूक नियमांचे फलक लावले असताना बेशिस्त वाहतूक करणाऱ्या व नो पार्किंगमध्ये गाड्या लाऊन वाहतूक समस्या निर्माण होत होती. अशा दहा गाड्यांवर, ट्रिपल सिट गाडी चालवणाऱ्या सात मोटर सायकलवर तसेच फॅन्सी नंबरप्लेट वर एक व दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या दोन गाड्यांवर खटले दाखल करून दंड आकारण्यात आला आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी मालवाहतूक गाडी उभी करणाऱ्या दोन गाड्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. जुन्नर मधील नवीन एसटी स्टँड, धान्यबाजार (शंकरपुरा पेठ) येथील बेशिस्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला. त्यावेळी साह्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब खेडेकर व पोलीस कमर्चारी ही उपस्थित होते. या कारवाईमुळे जुन्नर शहरातील काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटली आहे. (वार्ताहर)२८५ केसेसअवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पंधरा वाहनांवर कारवाई करून एकवीस हजार दंड वसूल करण्यात आला तर इतर २८५ वाहनांवर केसेस करून ३२ हजार ७00 दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेकडून मिळाली. तसेच वरील कारवाई ही पुणे ग्रामीणमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असून जवळपास तीनशे वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.जुन्नरसह इतरही पोलीस स्टेशनला धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांचा वचक राहील. यापुढेही कारवाई अशीच सुरू राहील.- जय जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक
बेशिस्त वाहतुकीला बसणार आळा
By admin | Published: June 16, 2015 12:31 AM