नीरा येथील कोविड केअर सेंटरला पुणे जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडियाचे अध्यक्ष संतोष कोलते आणि त्यांचे इक्वीनॉक्स सॉफ्टवेअर कंपनीतील सहकारी इंजिनिअर नीरव शहा, स्वाती खरोल, राहुल पानसरे, सारंग मोरे, राजुरी गावचे उद्योजक सुनील शिवरकर यांच्या वतीने पुरंदरमधील माळशिरस, नायगाव, वीर, नीरा कोविड सेंटरला वाफेचे मशीन व खळद येथील सेंटरला सॅनिटायझर भेट देण्यात आले.
नीरा येथे त्याची सुरुवात झाली. पुरंदर तालुक्यातील या चार कोविड सेंटरला प्रत्येकी १० प्रमाणे ४० वाफेचे मशिन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पुरंदर तालुका कार्यकारणी सदस्य राजेश चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष संदेश पवार, नीरा शिवतक्रार उपसरपंच राजेश काकडे, नीरा शहर अध्यक्ष प्रमोद काकडे, सोशल मीडिया अध्यक्ष अनिकेत सोनवणे, संतोष मोहिते, नायगावचे सरपंच हरिदास खेसे, रुग्णसेवक योगेश घाटे, मंगेश ढमाळ, अजिंक्य कड आदी उपस्थित होते.