हडपसर : साधना शैक्षणिक संकुलासह विविध शिक्षण संस्थांत हजारो विद्यार्थी पायी, सायकल, दुचाकीवरून तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रोज ये-जा करीत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी, सायकल तसेच विद्यार्थी वाहतूक करणारी असंख्य वाहने तासन्तास उभी असतात. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी येत्या १५ दिवसांत उपाययोजना कराव्यात; अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेना नेते समीर तुपे यांनी दिला आहे.हा रस्ता अरुंद असल्याने दुचाकी तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था इतरत्र करण्यात यावी. तसेच शाळांच्या वेळात अपवाद वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा. जनजागृतीपर सूचनाफलक लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)४प्रामुख्याने पादचारी, विद्यार्थिनी व महिला यांची खूपच कुचंबणा होत असते. अगोदरच अरुंद असणाऱ्या या रस्त्यावर प्रामुख्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे, दुचाकींच्या पार्किंगमुळे तसेच भरघाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या तरुणांमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास तर होतोच, शिवाय या परिसरात वारंवार अपघातही होत आहेत.
कोंडीतून सुटका करा
By admin | Published: October 11, 2016 1:40 AM