ग्रामीण भागातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करा: पुणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:34 PM2021-06-21T17:34:52+5:302021-06-21T17:35:06+5:30

पुणे जिल्ह्यातील सर्व एस. ई. झेड, एम. आय. डी. सी आणि औद्योगिक विभागातील सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत..

Get started now with hotels, restaurants and bars in rural areas: Pune District Hotel and Restaurant Association | ग्रामीण भागातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करा: पुणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

ग्रामीण भागातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करा: पुणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

googlenewsNext

पुणे : शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने हॉटेल्स,  रेस्टॉरंट व बार रात्री दहा पर्यंत सुरू केले आहेत. परंतु ग्रामीण भागात गेल्या एक वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने हाॅटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, येथील हाॅटेलस् , रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी लेखी मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

प्रशासनाने 10 जूनपासून पुणे शहरातील रेस्टॉरंट व बार चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ग्रामीण भागालाही आपण होम डिलिव्हरी ची परवानगी दिली आहे. पण ग्रामीण भागातील ग्राहक हा शहरातील ग्राहकांप्रमाणे सुशिक्षित आणि टेक्नॉसावी नसल्यामुळे होम डिलिव्हरी सुविधेचा उपयोग करत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल चालत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील हॉटेल,  रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधे संध्याकाळी ७ वाजे पर्यंत रेस्टॉरंट व बार मधून मद्य व जेवणाची काऊंटर वरून पार्सल सुविधा त्वरित चालू करण्याची परवानगी द्यावी.आम्ही एका वेळी एकच ग्राहकास पार्सल देवू. गर्दी होवू देणार नाही. 
----
एमआयडीसीतील हॉटेल, रेस्टॉरंट व बार तरी सुरू करा 
पुणे जिल्ह्यातील सर्व एस. ई. झेड, एम. आय. डी. सी आणि औद्योगीक विभागातील सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत. त्यामुळे औद्योगीक विभागातील कामगार व अधिकारी व तेथे येणाऱ्या मालवाहतूक कर्मचाऱ्यांची उदर निर्वाहाची सोय होईल. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन आमच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे ही विनंती . 
- बाळासाहेब दाते , अध्यक्ष पुणे जिल्हा (ग्रामीण)हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

Web Title: Get started now with hotels, restaurants and bars in rural areas: Pune District Hotel and Restaurant Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.