शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मागणी करूनही टँकर मिळेना

By admin | Published: January 06, 2016 12:48 AM

इंदापूर तालुक्यातील ८ गावे व १७ वाड्यांना ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कसलेही कारण न देता १७ ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव माघारी आले आहेत.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ८ गावे व १७ वाड्यांना ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कसलेही कारण न देता १७ ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव माघारी आले आहेत. कळंब (लोकसंख्या २ हजार ९५०), वडापुरी (४ हजार १००), शिरसटवाडी (४००), गलांडवाडी नंबर २ व विठ्ठलवाडी (१ हजार ५८), गोखळी (१ हजार २०५), खोरोची (३ हजार ३९६), वकीलवस्ती (१ हजार २५०), कवठळी (९१०) अशी टँकर सुरू असणाऱ्या गावांची नावे आहेत. तर कळंबनजीकच्या ५७ चाळ (लोकसंख्या ८९०), लालपुरी (९६०), लक्ष्मीनगर (६५०), वडापुरीनजीकच्या वेताळनगर (३५०), साठेनगर (४००), पवारवस्ती (२००), शिंदेवस्ती (२००), रामवाडी (३५०), पिंगळेवस्ती (६००), वकीलवस्तीनजीकची पांढरेवस्ती (२७५), माळशिकारेवस्ती (१६०), घोगरेवस्ती (१४०), सोपानवस्ती (४२५), कवठळीनजीकच्या खामगळवाडी (४१०), यमगरवस्ती (१४९), चोरमलेवस्ती (२१२), मारकडवस्ती (५५) या वाड्यावस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरू आहेत.एकूण २१ हजार ६९५ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापैकी गावठाणातील लोकसंख्या १४ हजार २११ तर वाड्या-वस्त्यांवरील लोकसंख्या ७ हजार ४८४ एवढी आहे. बिजवडी, निमसाखर, कडबनवाडी, सुरवड, चाकाटी, कचरवाडी (बावडा), बावडा, झगडेवाडी, तरंगवाडी, भोडणी, दगडवाडी, घोरपडवाडी, व्याहळी, निमगाव केतकी, कचरवाडी (निमगाव केतकी), वायसेवाडी (अकोले), शेटफळगढे, पिटकेश्वर, काझड या १९ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले होते. ते काहीही लिखित कारण न देता परत पाठवण्यात आले आहेत. (वार्ताहर)