'लोकांपर्यंत चिन्ह अन् उमेदवार पोहोचवा...'; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:56 AM2024-02-17T10:56:11+5:302024-02-17T11:00:22+5:30
तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदरचनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. शदर पवार यांनी आज बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
देशात याआधी असं घडलं नाही की, ज्यांनी पक्ष स्थापन केला. त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं. चिन्हाची काळजी करायची गरज नसते. मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढलो. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पहिल्या. कोणाला वाटत असेल चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल. मात्र असं कधी होत नसतं, असं शरद पवारांनी सांगितलं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या.
बारामती: देशात याआधी असं घडलं नाही की, ज्यांनी पक्ष स्थापन केला. त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं. चिन्हाची काळजी करायची गरज नसते, असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. @NCPspeaks@PawarSpeakspic.twitter.com/F8eDs6vSmQ
— Lokmat (@lokmat) February 17, 2024
...म्हणून राष्ट्रवादी अजित पवारांची
अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिबा आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेतही ४१ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचे लक्षात येते. पक्षाची घटना आणि घटनेनुसार असलेली पक्षनेतृत्त्वाची रचनेवर पक्ष कुणाचा, याचा निर्वाळा देता येणार नाही. बहुमताच्या निकषानुसार अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी असल्याचे नार्वेकरांनी सांगितले.
बाटली तीच औषध फक्त नवीन...
बाटली तीच औषध फक्त नवीन...आम्ही खरं आहे ते बोललो. पण दिल्लीतून स्क्रिप्ट केली. मग हे नाटक कशाला करायचे?, असा निशाणा रोहित पवारांनी साधला. भाजपाने पक्ष आणि कुटुंब फोडले. विधानसभा अध्यक्षांनी अन्याय करणारा निकाल दिला.ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत बसणार नाही. पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार आता तयार आहेत. २०२४ साली भाजपा आल्यावर संविधान राहणार नाही, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.