पुणे : नवीन ऑटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कागदपत्र तपासणीसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातील अपॉईंटमेंट मिळत आहेत. त्यामुळे त्यामुळे इच्छुकांना परवान्यासाठी ८ ते ९ महिने वाट पाहावी लागत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, हा विलंब टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन वेळापत्रक तयार केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन रिक्षा परवान्यांचे वाटप दोन वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. काही वर्षांपुर्वी हे परवाने देणे राज्य शासनाने बंद केले होते. त्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या सुमारे ४५ हजारापर्यंत खाली आली होती. नवीन परवाने सुरू झाल्यानंतर इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जात आहेत. त्यामुळे शहरातील रिक्षांचा आकडा ७० हजारांपर्यंत पोहचला आहे. अजूनही परवान्यासाठी अर्जदारांची ‘आरटीओ’ रांग लागली आहे. नवीन परवान्यासाठी अर्ज करणाºया अर्जदारांना त्यांची कागदपत्रे आरटीओकडे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे तपासणीनंतर परवान्याचा निर्णय घेतला जातो. मात्र त्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागत आहे. त्यासाठीचा दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यालयात कागदपत्रे सादर करावी लागतात. पण सध्या अर्जदारांना पुढील वर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील अपॉईंटमेंटच्या तारखा मिळत आहेत. त्यामुळे परवान्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. यापार्श्वभुमीवर आरटीओने हा विलंब टाळण्यासाठी विशेष मोहित हाती घेतली आहे. ऑनलाईन पध्दतीने अपॉईंटेमेंट घेतलेल्या अर्जदारांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकामुळे मे २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत अपॉईंटमेंट मिळालेल्या अर्जदारांची कागदपत्रे जुलै महिन्याच्या आतच तपासणी करून दिली जाणार आहेत. अर्जदारांनी नवीन वेळापत्रकानुसार सकाळी १०.३० ते १२ या वेळेत आरटीओ, कार्यालयात उपस्थित राहून कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.---नवीन वेळापत्रकऑनलाईन अपॉईंटमेंटचा महिना विशेष मोहिमेअंतर्गत वेळापत्रकमे २०१९ १३ ते १७ मेजून २०१९ २० ते २४ मेजुलै २०१९ २७ मे ते १ जूनऑगस्ट २०१९ ३ ते ७ जूनसप्टेंबर २०१९ १० ते १५ जूनऑक्टोबर २०१९ १७ ते २१ जूननोव्हेंबर २०१९ २४ ते २९ जूनडिसेंबर २०१९ १ ते ६ जुलैजानेवारी २०२० ८ ते १२ जुलै
पुणे शहरातील नवीन ऑटो रिक्षा परवान्यासाठी फेब्रुवारीपर्यंतच्या अपॉईंटमेंट फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:54 PM
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन रिक्षा परवान्यांचे वाटप दोन वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकाही वर्षांपुर्वी हे परवाने देणे राज्य शासनाने केले होते बंद अपॉईंटमेंट मिळालेल्या अर्जदारांची कागदपत्रे जुलै महिन्याच्या आतच तपासणी करून दिली जाणार