--
पाच-सहा वर्षांच्या मुलांनी अंथरूण ओलं केलं करी त्यांच्या आई-वडिलांना चिंता वाटायला लागते, शिवाय मुलाला मोठा आजार किंवा व्याधी असल्याची त्यांना शंका यायला लागते. त्यामुळे पालक तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यावर औषध गोळ्यांची अपेक्षा करायला लागतात. त्यावेळी बहुतांश डाॅक्टरांकडून हा आजार नसून मानसिकता किंवा सांगतात. मात्र तरी अनेक पालकांकडून त्यासाठी औषधोपचाराचीच अपेक्षा असते. ती चुकीची असून अपवादात्मक परिस्थितीतच हा आजार असू शकतो, एरव्ही ही सहा-सात वर्षांच्या मुलांपर्यंत ही समस्या स्वाभाविक असल्याचे सांगण्यात येते.----------------
सौरभ पाच वर्षांचा झाला. तरीसुध्दा आठवड्यातून तीन-चार वेळा तरी तो रात्री झोपेतच अंथरुण ओला करायचा. त्यामुळे त्याची मम्मी त्याच्यावर झोपेत चिडचिड करायची आणि सकाळी उठल्यावरही त्याला समजावून सांगायच्या आधीच त्याला आज रात्री पुन्हा केला तर काही तरी शिक्षा देईल असं काही सांगायची. त्यामुळे सौरभ रात्री झोपताना आणखी जास्त घाबरायला लागला, बाहेरच्या हॉलमध्ये किंवा इतर ठिकाणी झोपायचं टाळायला लागला, अनेकदा तर भीतीने रात्री उशिरापर्यंत जागायला लागला तरी त्याची समस्या दूर झाली नाही. अखेर त्याला डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टरांनी सौरभबरोबरच त्याच्या आई-वडिलांचेच समुपदेशन केले. हा आजार नसून बुहतांश मुलांमध्ये आढळणारी समस्या असल्याचे सांगितले. त्यावर मुलांना समजावून सांगणे व त्यांना समजावून घेणे हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर सौरभच्या आईने त्याला रात्री झोपण्याआधी पेशाब करून यायची आणि त्यानंतर पाणी न पिता तातडीने झोपण्यासाठी गोडीने समजावून सांगितले आणि मग सौरभमध्ये ही समस्या आठवड्यातून दोन वेळा-एक वेळा मग महिन्या-पंधरवड्यातून एकदा अशी कमी कमी होत गेली आणि आठ महिन्यांतच त्याची अंथरून ओलं करायची सवय पूर्ण मोडून गेली. शिवाय आता त्याला रात्री झोपण्याआधीही रोज सू-सू करून यायची सवयच लागली आणि रात्री अंथरून ओलं होईल याची मनात भीतीही नाही राहिली.
साधारण पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये ही समस्या बहुतांश वेळा आढळते, तर दहा वर्षांच्या वयापर्यंतच्या मुलांमध्येही समस्या सुमारे शंभरात पाच मुलांमध्ये अशी समस्या आढळते. मात्र तरी तो गंभीर आजार असेलच असे नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसते. बहुतांश वेळा ही समस्या मानसिक असू शकते. मुलांवर आलेले दडपण, घरातील पालकांसाठी बिघडलेला संवाद, रात्री झोपताना भीतिदायक चित्रपट, बेबसिरीज किंवा गप्पागोष्टी अशा घटनांमुळेही मुले रात्री झोपेत बेड ओले करतात. सात-आठ वर्षानंतरही मुलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसत असेल तर मात्र त्यावर उपचार करणे आवश्यक ठरते.
मुलांमधील ही समस्या रात्रीच्या झोपेतच जास्त आढळते. दिवसाच्या झोपेमध्ये असताना मुले अंथरूण ओले करत नाहीत ही बहुतांश डॉक्टरांकडे आलेल्या प्रकरणातून स्पष्ट होते. त्यातही मुलांच्या तुलनेमध्ये मुलींमध्ये हे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे सात-आठ वर्षांच्या नंतरही मुलांमध्ये ही समस्या जाणवत असेल किंवा पाच दिवसासुध्दा मुले अंथरूण ओले करत असतील व त्यांना त्रास ओटीपोटात किंवा लघवीच्या जागी वेदना होत असेल, थेंब, थेंब मूत्रविसर्जन होत असेल, खूप जास्त दुर्गंधी येत असेल तर मात्र हा वेगळा आजार समजून त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
--
चौकट -१
कोणत्या वयात किती टक्के समस्या
सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अंथरूण ओले करण्याची समस्या स्वाभाविक आहे
५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हे प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे.
१० वर्षांच्यापर्यंत मुलांमध्ये हे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत आहे
१५ पेक्षा अधिक वयाच्या मुलांमध्ये हे प्रमाण २ टक्के इतके आहे.
---
चौकट-२
असे करा काही उपाय
- मुलाला रात्री झोपण्याआधी सू-सू करुनच झोपायची सवय लावा
- रात्री जाग आलीच तर तेव्हाही बाथरुममध्ये स्वत: त्याला सू-सू करण्यास न्या.
- रात्री सू-सू करण्यासाठी अंधाऱ्या खोलीतून- जागेतून जाण्यास मूल घाबरत असेल तर प्रकाशाची व्यवस्था करा
- रात्री डायपर घालावून झोपवावे किंवा बेडवर वॉटरप्रूफ अंथरून टाकावे
- झोपण्याच्या ठिकाणी बेडजवळ कपड्यांची जोडी, टॉवेल ठेवा, ओलं करताच चिडचिड न करता गोडीने समजावत त्याचे कपडे बदला
- सकाळी उठताच मुलाला लवकर अंघोळ करण्याची सवय लावा म्हणजे त्याच्या अंगाला दुर्गंधी येणार नाही.----
दीपक होमकर