लांडेवाडी-पिंगळवाडी गावच्या हद्दीत माळवाडी येथे दत्ता पांडुरंग वाघ याच्या घरासमोरील आडोशाला गावठी हातभट्टी तयार दारू करण्याचे कच्चे रसायन बेकायदा स्थितीत मिळून आले, परंतु पोलिसांची चाहूल लागताच हा पळून गेला. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार महेश झनकर यांनी पोलीस ठाण्यात दिली.
तर, दुसऱ्या एका घटनेत सुपेधर येथील रवींद्र वामन वाघ हा घोडनदीच्या कडेला झुडपांच्या आडोशाला बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करत होते, परंतु पोलिसांची चाहूल लागताच हा देखील पळून गेला. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार दत्तात्रय जठर यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये आरोग्यास घातक ठरणारे १ हजार २२० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.
शिनोली येथील महिला घराच्या पाठीमागे आडोशाला ओळखीच्या लोकांना देशी दारू विकत असताना मिळाली तिच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संदीप लांडे यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवराम धादवड, अविनाश कालेकर करत आहे.