पुणे : महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण पडत आहे. असे असताना देखील भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे हे डॉ़वैषाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले. घोगरे यांच्या वेगळ्या काही मागण्या असतील किंवा एखादे काम झाले नसेल तर कशा प्रकाराने बोलायचे याची आचारसंहिता पाळणे आवश्यक होते़ परंतु, त्यांच्या या वर्तनामुळे कायद्याला हरताळ फासला गेलेला आहे़ त्यामुळे या प्रकरणाची चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी अशी सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे़
सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये महिला कर्मचारी, महिला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना काम करता आले पाहिजे. ही महापालिका आयुक्तांसह शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे़ अशावेळी घोगरे यांच्या कडून गैरवर्तन झाले त्याबद्दल ना.डॉ.गोºहे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व चौकशी समिती नेमण्याची सूचना मनपा आयुक्त यांना केली आहे. तसेच डॉ जाधव यांची व आरोग्य कर्मचाºयांशी घोगरे यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या चौकशी समितीचा अहवाल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देखील दिले असून, जेणेकरून घोगरे यांच्या वर्तनाच्या संदर्भात राज्य शासनाकडून कारवाई करायची याबद्दल विचार करू शकेल असे देखील डॉ.गोºहे यांनी सांगितले आहे.
---------------------