यावेळी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवणे, अभ्यासवर्ग सुरू असताना येणाऱ्या अडचणी त्यामध्ये नेट चालू असणे पालकांच्याकडे मोबाईल असणे-नसणे तसेच घरात दोन किंवा जास्त विध्यार्थी असल्यास व फक्त एक मोबाईल असल्यास अशा अनेक अडचणी तसेच इयत्ता आठवी पर्यंत विद्यार्थी पास करणे व परीक्षा न घेता मागील मार्क्स व सर्व अभ्यासक्रमावर उत्तीर्ण करणे यामुळे पाल्य अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात व ऑनलाईन वर्ग हजेरी नसणे या बाबीकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली.
प्रसंगी शाळेच्या वतीने घोटवडे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भिमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे, हनुमंत घोगरे, संतोष गोडाबे, संभाजी गोडाबे, भाग्यश्री देवकर, निकिता घोगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तात्यासाहेब देवकर, आनंद घोगरे, निलेश गोडाबे, पत्रकार साहेबराव भेगडे, शिवाजी देवकर हजर होते. शाळेच्या मुख्याध्यापिका गुंजाळ, सहशिक्षक मोहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सातव सूत्रसंचालन केले. मालन ववले यांनी आभार मानले.