कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार खताळ यांच्या पुढाकाराने तसेच गावातील तरुण आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने २५ बेडचे कोविड सेंटर (विलगीकरण कक्ष) गिरीम गावातीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी आमदार राहुल कुल म्हणाले की, परिसरातील चार ते पाच गावांमधील कोविडचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवता येईल त्यामुळे संसर्गाचा प्रभाव कमी होऊन कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल, कोविड सेंटरच्या सुरू होण्याप्रसंगी सरपंच नंदकुमार खताळ, उपसरपंच रुपाली मांढरे, ग्रामपंचायत सदस्य, डॉ. भागवत, आरोग्यसेवक डॉ. दिवेकर, पोलीस पाटील कल्पना लोणकर, ग्रामसेविका निलांबरी खैरे, डॉ. लालासाहेब शिंगटे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संदीप गावडे उपस्थित होते. ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांनी या केंद्रामध्ये येऊन दाखल व्हावे, असे आवाहन सरपंच नंदकुमार खताळ यांनी केले आहे.