पुणे : संस्काराशिवाय माणूस म्हणजे जनावर आहे , मनावर संस्कार असल्यास माणूस आनंदी राहतो. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर कोणतेच विकास काम अशक्य नाही. आणि गेल्या काही वर्षातच आमच्या पक्षातील नगरसेवकांनी विकास कामाचा सपाटाच चालू केला आहे, गेल्या पन्नास वर्षात जमले नाही ते पाच वर्षात मोदींनी केले, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले . सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरमधील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना बापट म्हणाले , कोर्ट कचेरी करण्यापेक्षा नागरिकांनी सामाजिक कार्यात वेळ खर्ची करावा, लोकप्रतिनिधींनी विकासकामे जरूर करावीत मात्र, नागरी समश्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक यांचीही यावेळी भाषणे झाली. नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या संस्कार शिल्पाचे ,चैत्यन्य उद्यान व कै बाळासाहेब उर्फ नरहरी कुदळे पाटील येथे ऍमिनिटी उद्यान तसेच स्मार्ट अर्बन पुथपाथ चे उदघाटन यावेळी करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यानी मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही पालकमंत्राच्या समोर सादर केले. त्यास पालकमंत्र्यांनी दाद दिली. यावेळी भाजपा खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेविका ज्योती गोसावी, माधुरी सहस्रबुद्धे, अनिता कदम, राजश्री नवले, आनंद रिठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.