पुणे : राज्याचे संसदीय कामकाम मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला नाही. या कार्यक्रमाला त्यांनी जाणीवपूर्वक मला टाळले. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दांत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.पुणे शहरातील भाजपच्या आठही आमदारांनी पुणे शहराच्या विकासाला गती दिली नाही. भाजपची गुर्मी येत्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवण्यासाठी मी स्वत: पुणे शहराच्या राजकारणात लक्ष घालणार असून, येत्या निवडणुकीत याची जाणीव सर्वांना होईल, असा इशाराही शिवतारे यांनी दिला. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत सेना-भाजपा युती व्हावी, अशी गोडीगुलाबी चर्चा भाजप नेते करतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)बापटांची कूटनीती : माझ्या मतदारसंघातील तीन प्रभाग महापालिकेत येतात. मनपा प्रत्येक विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी नाव टाकते; पण मेट्रो उद्घाटनाच्या वेळीत्यांनी हेतुपुरस्सर टाळले. यावरून बापट यांची कूटनीती दिसून येते. - विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री
गिरीश बापट यांना सत्तेची मस्ती - विजय शिवतारे
By admin | Published: December 27, 2016 1:21 AM