पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्व स्तरावरून बापटांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बापट यांचे निधन हे अत्यंत मनाला चटका लावून जाणारी वेदनादायी घटना अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
फडणवीस म्हणाले, बापट यांचे निधन हे अत्यंत मनाला चटका लावून जाणारी वेदनादायी घटना आहे. गेल्या काही दिवसात मी दोनदा त्यांना भेटलाे. आजाराला देखील न घाबरता, एका योध्दाप्रमाणे संघर्ष केला. दुर्देवाने त्यांचे आज दुख:द निधन झाले. समाजात त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखा आहे. सर्व पक्षांमध्ये त्यांचे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी माणसे जोडली. सर्वांना हवा हवा असलेला नेता आपण गमावला. प्रथम राष्ट नंतर संघटन व व्यक्ती हे तत्व त्यांनी पाळले. माझ्यासाठी मोठ्या भावासारखे होते. दिलदार मोकळ्या मनाचा माणूस अशी त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांनी विधानसभेतील काम विरोधकांनाही आपलेसे वाटणारे होते. कसबा पोटनिवडणूकीत आम्हाला त्यांना जवळून पाहता आले ओळखता आले. पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले.
या खाणीतील तयार झालेले अनमोल रत्न आमचे गिरीश भाऊ होते. आमचा अतिशय जवळचा संबंध होता. १५ वर्ष आम्ही बरोबर रहिलो. गिरीश आम्हाला जेवण तयार करून द्यायचे. चपराशापासून मंत्र्यापर्यंत त्यांचे संबंध. बोलण्यामध्ये एवढे चख्खल होते. की समोरचे लोक शांत बसायचे. कोणालाही न दुखवता शालजोडीजतील शब्द वापरून आपले मुद्दे मांडायचे. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. एक नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षाच्या भिंतीपलीकडेच त्यांचे संबंध होते. आमचे सोबत संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या काळात मी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना चिंतामुक्त असायचो. कितीही आणीबाणीची परिस्थिती आली तरी ते त्यांतून मार्ग काढायचे. रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असे संबंध त्यांचे होते. बापट हे एक शेतकरी होते. अमरावतीमधील शेती ते करायचे. शेतीवर प्रचंड प्रेम होते. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व कशाला म्हणतात हे बापट यांच्याकडे बघितल्यावर कळते. सर्वाक्षेत्रातील प्रचंड ज्ञान बापट याना होते. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पचविण्याची शक्ती देवो.