कामशेत : येथील कामशेत रेल्वे स्टेशन अलीकडे रेल्वे ट्रक ओलांडताना आलेल्या एक्प्रेस गाडीच्या भीतीने वाचण्यासाठी एका बाजूला पळालेल्या एका युवतीचा पाय घसरून पडल्यानंतर दगडाचा डोक्याला मार लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी पुण्यातील होस्टेल मध्ये राहणाऱ्या पाच ते सहा तरुणी कामशेत जवळील पिंपळोली गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या. रविवार दि. १ रोजी सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास त्या परत निघाल्या असता कामशेत रेल्वे स्टेशन अलीकडे रेल्वे ट्रक ओलांडताना मागून आलेल्या एक्प्रेस गाडीच्या भीतीने पळालेल्या त्यातील स्नेहलचा पाय घसरून ती बाजूलाच असलेल्या इंद्रायणी नदी पात्राच्या कडेला असलेल्या दगडावर डोके आपटून पडली. या झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणावळा लोहमार्ग पोलीस हवालदार जाधव यांनी दिली.
कामशेत जवळील पिंपलोळी गावात राहणाऱ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी आलेल्या पुण्यात होस्टेल वर राहणाऱ्या पाच ते सहा मैत्रणी यांनी वाढदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघाल्या असता लोकल सुटू नये म्हणून रेल्वे ट्रकने चालल्या होत्या, मात्र रेल्वे किलोमीटर नंबर १४३/२४ जवळ मागून येणाऱ्या एक्प्रेस गाडीचा आवाज ऐकून त्या दचकल्या स्नेहल बाजूला पळताना तिचा पाय घसरला व ती शेजारीच असलेल्या इंद्रायणी नदीच्या उतारावर पडून दगडावर डोके आदळून अपघात झाला. तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.