पुणे: शिवनेरी किल्ल्यावर शुक्रवारी एका तरुणीचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवण्यात यश आले आहे. या मुलीचे नाव सुहानी रघुनाथ खंडागळे असून ती जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील रहिवाशी होती. शिवनेरी किल्ल्यावरील पहिल्या दरवाज्याजवळच तिचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. गडाच्या पायथ्याशी तिची दुचाकी क्रमांक MH14-W9426 आढळून आली आहे. याशिवाय, कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल असे नाव असलेले दप्तरही पोलिसांना मिळाले. शिवनेरीवर झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.