पुणे : महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी एका तरुणावर दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. संजना संजय चिल्लाळ (वय १९ सदाशिव पेठ) असे तिचे नाव आहे. श्रेयस सरकार (सदाशिव पेठ) असे संशयिताचे नाव आहे.तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकार याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १२मे रोजी संजना हिने ओढणीने गळफास लावून आत्मह्त्या केली होती. ती एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत होती. सरकार आय.टी. कंपनीत कामाला आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. संजना हिच्या नातेवाइकांनी तिच्या डायरीत असलेल्या नोंदीवरून सरकार व तिच्यात वाद झाले असावेत, तिला त्रास दिला गेला असावा, असा संशय व्यक्त केला आहे, असे फौजदार आर. डी. मोहिते यांनी सांगितले.
तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा
By admin | Published: June 10, 2015 5:18 AM