लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकरमळा येथे उघडकीस आली असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. पीडित मुलीनेच सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा (वय ३६) रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी त्याला सोडून गेली होती. शिक्षणानिमित्त वडिलांकडेच राहिलेल्या पीडित मुलीवर बापानेच फेब्रुवारी २०१६पासून वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी मुलीला दिली होती. या प्रकरणाचा तपास परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) नीलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बबन खोडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन मोहिते, सहायक फौजदार यशवंत ओंबासे, नीलेश जमदाडे, पोलीस शिपाई राहुल शेडगे यांनी शिताफीने व कौशल्याने आरोपीचा पाठपुरावा करून त्याला ताब्यात घेतले.
मुलीवर बलात्कार; बाप अटकेत
By admin | Published: May 12, 2017 5:26 AM