शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या; नराधमाला पोलिसांनी १२ तासात पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:00 PM

लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून तरूणाने तरुणीचा जीव घेतला

चाकण : एकतर्फी प्रेम प्रकरणातून एकवीस वर्षीय युवतीचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.चाकण औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता.खेड ) येथे (दि.२८ ) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी खून करून रातोरात फरार झालेल्या आरोपीला कराड (जि. सातारा ) येथून जेरबंद करण्यात आल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिली. प्राची विजय माने (वय.२१ वर्षे,सध्या रा.आंबेठाण,ता.खेड,जि. पुणे,मुळ रा.उरुण, इस्लामपुर,ता.वाळवा जि.सांगली )असे खून करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी अविराज रामचंद्र खरात (रा.बहे,ता. वाळवा,जि.सांगली) यास अटक करण्यात आली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अविराज याने मैत्रीण प्राचीकडे लग्नाचा तगादा लावला होता. परंतु तिने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून अविराज हा (दि.२८ ) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्राची राहत असलेल्या आंबेठाण येथील रूमवर जाऊन तू माझ्याशी लग्न का करत नाही? असा प्रश्न विचारून,अविराज हा तिचा मोबाईल घेऊन चाकण-आंबेठाण रस्त्याजवळील मोकळ्या मैदानात आला. प्राची ही त्याच्याकडे मोबाईलची मागणी करत त्याच्या पाठोपाठ तिथे आली असता. अविराज याने अंधाराचा फायदा घेऊन अचानक प्राची हिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे ठार मारले आणि तो आपल्या दुचाकी वरून पळून गेला होता. यामुळे आरोपाला शोधणे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले होते.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा ( युनिट ३ ) च्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असताना आरोपी हा कराड,सातारा येथे दुचाकीवरून जात असल्याचे समोर आले.पोलिस पथकाने सातारा ते कराड महामार्ग एनएच ४ वर सापाळा रचुन १० ते १५ किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेत असताना त्याने मोटर सायकल न थांबविता मोटर सायकलसह पुढे पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पथकातील अंमलदारांनी जिवाची परवा न करता शिताफिने आरोपीस ताब्यात घेऊन म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.  सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड,यदुआढारी,सचिन मोरे,विठठल सानप,ऋषीकेश भोसुरे,सागर जैनक,राजकुमार हनमंते,रामदास मेरगळ,योगेश्वर कोळेकर,त्रिनयन बाळसराफ,सुधिर दांगट,समीर काळे,शशिकांत नांगरे,राहुल सुर्यवंशी,नागेश माळी यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीChakanचाकणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड