मुंढवा - भरधाव वेगात मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मिक्सर डंपरची धडक बसून आर्किटेक्ट विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आपल्यासमोरच मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचे पाहून दुसरी तरुणी धक्क्याने बेशुद्धावस्थेत आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. प्राची सतीश भुजबळ (वय २२, रा. अॅमनोरा टॉवर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आर्किटेक्चर कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिकत होती. प्राची ही तिची मैत्रीण श्रुतिका विकास शिंदे (वय २०, रा. हडपसर) हिच्यासह दुचाकीवरून कोरेगाव पार्कहून मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावरून हडपसरकडे जात होत्या. याच पुलावर पाठीमागून आलेल्या भरधाव डंपर मिक्सरची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. प्राची दुचाकीवरून खाली पडून ती डंपरच्या टायरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. श्रुतिका गाडी चालवित होती. यात ती सुदैवाने बचावली. या घटनेनंतर या डंपरचा (मिक्सरचा) चालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला.एकुलती एक मुलगी अचानक गेलीसणसवाडीच्या जवळच राहणारे हे भुजबळ कुटुंब, परंतु व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यातील हडपसर भागात अॅमनोरा टॉवर येथे स्थावर झालेले. प्राचीला एक भाऊ आहे. अत्यंत हुशार आणि अनेकविध कलांची आवड तिला होती. ती आर्किटेक्चरला चौथ्या वर्षात शिकत होती.मुंढव्यात अपघातांची मालिका सुरूचमुंढवा परिसरात दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. खराडी-हडपसर बायपास हा मार्ग मुंढव्यातून गेलेला आहे. या मार्गावर जड वाहने भरधाव वेगाने मार्गस्थ होत असतात. वाहनचालकांकडूनही शिस्तीचे पालन होताना दिसत नाही. या उड्डाणपुलावर येण्यासाठी मुख्य रस्त्यावरून तसेच उड्डाणपुलाखालून वाहनांची रिघ लागते. हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. या मार्गावर अनेक निरपराध जीवांचा बळी गेला आहे. जेव्हा रस्ते रिकामे असतात त्यावेळी शर्यत लागल्यासारखी वाहनचालक आपली वाहने पळवत असतात. येथील महात्मा फुले चौकात तर पादचाºयांना, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे. अशा वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याची गरज आहे. तसेच या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येथे वारंवार अपघाताचे सत्र सुरूच असते. वाहतूक विभागाने अशा बेदरकारपणे वाहने चालविणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी मृत्युमुखी, सोबतची मैत्रीण धक्क्याने बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 1:34 AM