पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून धर्मांतरण करण्याचे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. निसर्गचक्र फार वेगळ झालय झालय. मुली १२ व्या आणि १४ व्या वर्षी वयात येत आहेत. १४ व्या १५ व्यावर्षी वयात मुली गर्भवती होत आहेत, हे अतिशय गंभीर बाब आहे. तसेच मुलींना फोर्स फुली पळवून नेणे, अशा मुलीच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी आपल्याकडे कोणताच कायदा नाही आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव जिहाद सारखा कायदा व्हायला हवा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत पिंपळेगुरव येथे केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपळेगुरव येथे शहरातील महिला आघाडीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणासाठी फास्टट्रॅक न्यायालये सुरू
वाघ म्हणाल्या, ‘‘बलात्काराच्या किंवा महिला अत्याचाराबाबत कायदे आहेत. तसेच शासकीय यंत्रणाही आहे. मात्र, त्या घटनेनंतर पिडीताच्या जीवनात दुसऱ्या दिवसापासून लढाई सुरू होते. तिचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच सरकारच्या वतीने मनाधैर्य योजना आहे. तीन पाच लाखांची मदत करण्यात येते. ही मदत मिळवून देण्याची गरज आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणासाठी फास्टट्रॅक न्यायालये सुरू करावेत, स्वतंत्र न्यायालय असाावेत, ’’
राठोड प्रकरणात लढाई सुरूच
वाघ म्हणाल्या, ‘‘पूजा चव्हाण प्रकरणात ज्यावेळी रस्त्यावरची लढाई होती, त्यावेळेस मी रस्त्यावर उतरून लढले. आता न्यायालयात कायदेशीर लढाई आहे. ती मी आताही न्यायालयात लढत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात मी एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे माझ्यावर आता जे आरोप होतात की तुम्ही संजय राठोड प्रकरणात लढताना दिसत नाही. हे आरोप खोटे आहेत. माझ्यावर कोणताच दबाव नाही. माझा फ्लॉलोअप सुरू आहे.’’