ड्युक्स नोजच्या चढाईमध्ये प्रियंका चिंचोरकर, सायली बुधकर, पल्लवी वर्तक, केतकी पाठक, अंजली कात्रे, स्नेहा गुडे, स्मिता करेवाडीकर व स्नेहा तळवटकर यांनी सहभाग नोंदविला. समीरन कोल्हे यांनी संघाला मार्गदर्शन केले. गिरिप्रेमीच्या नवीन पिढीतील गिर्यारोहक वरुण भागवत व रोहन देसाई यांनी खडापारशीचे आवाहन यशस्वी पेलले.
खडापारशी अर्थात वानरलिंगी हा सुळका नाणेघाट परिसरातील जीवधन किल्ल्याजवळ स्थित आहे. ४५० फूट उंच असलेल्या या सुळक्यावरील चढाई अतिशय कठीण श्रेणीत येते. एका बाजूला असलेली ३००० फुटांपेक्षा खोल दरी व ९० अंश कोनातील खडी चढाई रॉक क्लायंबर्ससाठी आव्हानात्मक ठरते. ड्युक्स नोजचा सुळका हा रॉक क्लायम्बिंगसाठी प्रसिद्ध आहे. शेवटच्या टप्प्यात असणारा ‘ओव्हरहँग’ क्लायंबर्ससाठी अधिक आव्हानात्मक आहे, मात्र गिरिप्रेमीच्या ताज्या दमाच्या महिला गिर्यारोहकांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून चढाई यशस्वी केली. या चढाईचे वैशिष्ट्य म्हणजे या संघातील ५४ वर्षीय अंजली कात्रे यांनी या वयात ड्युक्स नोजवर यशस्वी चढाई केली. या दोन्ही संघांना ज्येष्ठ गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले.