बारामती: महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा बारामती तालुक्याचा निकाल ९६.३२ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा निकलाच्या १.०६ टक्के वाढ झाली आहे. हाच निकाल गेल्या वर्षी ९५.२६ टक्के लागला होता.
बारामती तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलींनी निकालात बाजी मारली आहे. परीक्षेस बसलेल्या ३९९२ मुलींपैकी ३९२८ मुली म्हणजेच ९८.३९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ३७६२ मुलांपैेकी ३५४१ म्हणजे ९४.१२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या तुलनेने मुलींचा ४.२७ टक्के निकाल अधिक लागला आहे. तालुक्यात ७७५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १०१३ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (डीस्टींक्शन) प्राप्त केली. प्रथम श्रेणीत ३२०० तर द्वितीय श्रेणीतत २७४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ७४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारामती शहर आणि तालुक्यातील महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे-
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती ९२.९० टक्के, एम. एस. काकडे ज्युनिअर कॉलेज, सोमेश्वरनगर ९०.५५, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय ९९.०५, श्री शहाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सुपे ९९.३४, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती ८९.४७, न्यू ज्युनियर कॉलेज, वडगाव निंबाळकर- ६०.८६, म.ए.सो. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बारामती ९२.८५, शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवनगर १००, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय,मोरगाव ९३.६७ ,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वाणेवाडी ७८.५७ , नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनियर कॉलेज, पणदरे ९९.४५, शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर ९९.७६, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी ७०.५८, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, होळ १००, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय बारामती ९३.९२, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर ९६.५७, उत्कर्ष जुनियर कॉलेज, वाघळवाडी ९६.८७, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्युनिअर कॉलेज, माळेगाव ६६.६६, कृषी उद्योग शिक्षण संस्था, का-हाटी ९९, एस.व्ही.एम. अँड ज्युनिअर कॉलेज,भिकोबा नगर ९८.६१, सदगुरु शिक्षण मंडळ, लोणी भापकर ९०, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर ९९.५८, श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक ९९.५८, श्री सिद्धेश्वर हायस्कूल, को-हाळे बुद्रुक १००, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारवडी १००, म. ए. सो. उच्च माध्यमिक विद्यालय ८८.३७, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल १००, धों.आ. सातव कारभारी विद्यालय, बारामती १००, शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय १००, एस.पी.सी.टी.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स ९९.७१, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज ९९.४०, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्राम नगर ९९.८०, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पळशी १००, आदित्य इंटरनॅशनल स्कूल वंजारवाडी १००, शारदाबाई पवार आयटीआय शारदानगर ८३.३३, मयुरेश्वर प्रतिष्ठान आयटीआय खंडूखैरेवाडी ६६.६६, शासकीय आयटीआय ८६.२०, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (व्होकेशनल) ९३.३३, मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर (व्होकेशनल) ७५, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज (व्होकेशनल) ९०, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय, सुपे (व्होकेशनल) १००, शारदाबाई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज, शिवनगर (व्होकेशनल) ९१.८९, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज, वाणेवाडी (व्होकेशनल) ८९.४७.