लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता बारावीचा निकालाच्या टक्केवारीत जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मुलींची टक्केवारी सर्वाधिक असून त्यांनी निकालात बाजी मारली आहे़ मुलींच्या निकालाच्या टक्केवारीत वेल्हे तालुक्यानेच बाजी मारली असून सर्वाधिक ९८.२८ टक्के मुली पास झाल्या आहेत़ तर सर्वांत कमी मावळ तालुक्यातील ९३.८२ टक्के मुली पास झाल्या आहेत़ जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.५९ टक्के लागला आहे. यात मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९४.९२ टक्के मुली, तर ८७.३२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी ही टक्केवारी ९२.१० व ८३.१८ इतकी होती. पुणे शहरातही मुलींचेच वर्चस्व राहिले आहे. शहरांतील अनेक महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत पहिल्या दहा क्रमांकामध्ये मुलींनी स्थान मिळविले आहे. शहराच्या पुर्व भागात ९३.०३ टक्के तर पश्चिम भागात ९२.७४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी जास्ततेराही तालुक्यांत मुलींनीच बाजी मारली आहे. एकही तालुक्यात मुलींपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त नाही.त्यातही वेल्हा तालुक्यातच सर्वाधिक ९८.२८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. वेल्हा तालुक्याचा ९५.०६ टक्के इयत्ता बारावीच्या निकालात तेरा तालुक्यांत वेल्हे तालुक्याने बाजी मारली असून ९५.०६ टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल ८८.०६ टक्के मावळ तालुक्याचा लागला आहे. गेल्या वर्षीही वेल्हा तालुक्याचा निकाल सर्वाधिक व मावळ तालुक्याचा निकाल सर्वांत कमी लागला़मुलेमुलीटक्केआंबेगाव८९.९८९६.७०९३़१३ बारामती८९.९३९७.४३९३़४५भोर८६.३३९५.७४९०़४६दौैंड८६.८५९५.५०९०़१८हवेली८५.८८९४.९९८९़३१इंदापूर८७.२७९५.४५९०़४४जुन्नर८६.८६९६.००९१.१६खेड८५.९३९४.३२८९.५६मावळ८२.७६९३.८२८८.०६मुळशी८८.८४९५.२९९१.७०पुरंदर९०.२२९६.७०९३.०५शिरूर९२.५१९६.९९९४.४२वेल्हा९२.८३९८.२८९५.०६१२१ विद्यालये १०० नंबरी...! जिल्ह्यात १३ तालुक्यांतील एकूण शाळा महाविद्यालयांपैकी १२१ विद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. त्यात हवेली व मावळ तालुक्यात सर्वाधिक १४ विद्यालये असून त्यानंतर इंदापूर, शिरूर १३, बारामती १२, दौंड १०, जुन्नर, खेड, पुरंदर ९, आंबेगाव, भोर ६, मुळशी ४, तर वेल्हेतील ३ विद्यालयांचा समावेश आहे. आंबेगाव : ज्युनिअर कॉलेज मंचर, हुतात्मा बाबू गेणू, महाळुंगे पडवळ, श्री.आयटीएस बोरडे, शिणोली, निवृत्तीशेठ दाजी कॉमर्स, पेठ , विद्याविकास मंदिर, अवसरी बु., संगमेश्वर विद्यालय (सायन्स), पारगाव, शिंगवे. बारामती : शहाजी ज्युनि. कॉलेज (कॉमर्स), शारदाबाई पवार विद्यालय (कॉमर्स) शिवनगर, मयूरेश्वर हायस्कूल मोरगाव, नवमहाराष्ट्र विद्यालय (कॉमर्स) पंदेरे, कृषी उद्योग शिक्षण (सायन्स/ आर्टस्), एस.व्ही. एम.आय.पंदेरे, शारदाबाई पवार विद्यानिकेतन (सायन्स) शारदानगर, गावडे विद्यालय (सायन्स) पारवडी, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सायन्स) मेढा, न्यू इंग्लिश हायस्कूल वाणेवडी, नव महाराष्ट्र विद्यालय पंदेरे, शारदाबाई पवार महिला विद्यालय शारदानगर. भोर : गर्लस ज्युनि. कॉमर्स, माध्यमिक विद्यालय, खाणापूर, सारोळे माध्य. विद्यालय (कॉमर्स), अमृता विद्यालय (सायन्स) बणेश्वर, फडके स्मृती विद्यालय (कॉमर्स), गर्लस हायस्कूल. दांैेड : न्यू इंग्लिश स्कू ल (सायन्स) पारगाव, गॅरेला विद्यालय (सायन्स), फिरंगाईमाता हायस्कूल (सायन्स/कॉमर्स) कुरकुंभ, एन.टी. पवार हायस्कूल (सायन्स) सोनवडी, मेरी मेमोरियल हायस्कूल (सायन्स), सेबस्टीन हायस्कूल, दौंड, खांबेश्वर न्यू इंग्लिश हायस्कूल (सायन्स) खांबगाव, सरस्वती विद्यालय (सायन्स) रावणगाव, मनोदया गर्लस् हायस्कूल (सायन्स) केडगाव, नवयुग विद्यालय (सायन्स/आर्टस) केळवडी, हवेली : व्ही.एस. सातव कॉलेज (सायन्स) वाघोली, संत तुकाराम कॉलेज (सायन्स/ कॉमर्स) लोहगाव, नागेश्वर विद्यालय (कॉमर्स) मोशी, एन.एस. विद्यालय (कॉमर्स) वडगाव, पेरणा महाविद्यालय (कॉमर्स), स्वामी महाविद्यालय (कॉमर्स), तुबलवडेकर महाविद्यालय (सायन्स/ कॉमर्स), एंजल्स हायस्कूल लोणीकाळभोर, डी.बी. देवधर हायस्कूल (कॉमर्स), लोकसेवा हायस्कूल (सायन्स) फूलगाव, गायत्री हायस्कूल (सायन्स), वाघेश्वर विद्यालय (सायन्स), चाटे हायस्कूल वाघोली, रायसोनी ज्युनि. कॉलेज (सायन्स/ कॉमर्स) वाघोली. इंदापूर : गोविंदराव पवार विद्यालय (सायन्स) भवानीनगर, पळसनाथ विद्यालय (सायन्स), निमसाखर कॉलेज (सायन्स / कॉमर्स), भारत चिर्ल्डन्स अॅक ॅडमी (सायन्स) वालचंदनगर, नांद विद्यालय (सायन्स), बोरटवाडी विद्यालय (कॉमर्स), कर्मयोगी शंकरराव पाटील (आर्टस् / कॉमर्स) कुरवली, अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय (सायन्स), हरणेश्वर विद्यालय (सायन्स),के. क्षीरसागर कॉलेज (कॉमर्स), फडतरे विद्यालय (सायन्स) इंदापूर, एसके व्ही कॉलेज (सायन्स) इंदापूर, बनसोडे विद्यालय (सायन्स/ कॉर्मस) पळसदेव. वेल्हा : तोरणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, तानाजी मालुसरे मठ, दापोडे, अमृतेश्वर कॉलेज.शिरूर : कालिकामाता महाविद्यालय, श्रीमहागणपती कॉलेज रांजणगाव, विजयमाला ज्यु. कॉलेज, एस.पलांडे कॉलेज, एस.पी.भुजबळ कॉलेज, आर.जी. पलांडे, कॉलेज, एच.जी, गायकवाड कॉलेज संभाजीराजे कॉलेज राजेगाव, न्यू इंग्लिश स्कूल, मलठण, श्रीवाघेश्वर विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे, विद्याधाम प्रशाला शिक्रापूर, पुरंदर : एल.आर. शहा कन्याशाळा नीरा, एमजेपीव्ही व एसएमके ज्युनिअर कॉलेज शिवरी, श्री शिवाजी इंग्लिश मीडियम, जिजामाता विद्यालय जेजुरी, वाघिरे महाविद्यालय सासवड, शंकरराव कोलते विद्यालय, अब्दुलभाई चांदभाई हुंडेकरी, ऋषी वाल्मीकी ज्युनिअर कॉलेज.मुळशी : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, श्रीगमेड ज्युनिअर कॉलेज, मारुंजी, राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, श्रीछत्रपती ज्युनिअर कॉलेज, पौड.खेड : विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चाकण, डेहणे ज्यु. कॉलेज, उच्च माध्यमिक विद्यालय (कॉमर्स) वाशिरे, भैरवनाथ विद्यालय दोंदे, महात्मा गांधी विद्यालय, श्री. गायकवाड विद्यालय दावडी, सीताबाईं पाटोळे चाकण, कर्मवीर भाऊराव पाटील वाडा.जुन्नर : श्रीरंगदासस्वामी, विद्यानिकेतन साकोरी, आरएसएस कॉलेज, हांडे-देशमुख कॉलेज आळेफाटा, डॉ. सी.के. ज्यु. कॉलेज खानापूर, जे.आर.गुंजाळ इंग्लिश मे. स्कूल, विद्याविकास मंदिर राजुरी, सावित्रीबाई फुले गर्ल,स्कूल, श्रीबेल्हेश्वर/हरी गुंजाळ ज्यु. स्कूल.आॅनलाईन प्रवेशप्रकिया आजपासून लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावीचा निकाल जाहीर होताच शहरातील प्रमुखा महाविद्यालयांच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून (बुधवार) सुरूवात होणार आहे. काही महाविद्यालयांनी मात्र विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना आता वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान व कला शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी बुधवारपासून आॅनलाइन अर्ज देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यांना आॅनलाइन अर्जाची प्रिंटआऊट काढून त्याला गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रे जोडून ती कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. बीएमसीसी महाविद्यालयातील वाणिज्य विभागच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियाही याच पद्धतीने पार पडणार आहे. प्रवेशाची अधिक माहिती फर्ग्युसन व बीएमसीसी महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली. सप महाविद्यालयाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशाची आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ जून पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर ९ जून रोजी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल अशी मााहिती सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सेठ यांनी दिली.गरवारे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर ९ जून नंतरच सुरू केली जाणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना गुणपत्रिका स्कॅन करून अपलोड करावी लागेल अशी माहिती गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्या मुक्तजा मठकरी यांनी दिली. मॉडर्न महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे अर्ज संकेतस्थळावर बुधवार पासून आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यांना आॅनलाइन अर्जात भरलेली गुणांची माहिती व गुणपत्रिका यांची महाविद्यालयातून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे अशी माहिती मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांनी दिली.
मुलींची बाजी!
By admin | Published: May 31, 2017 2:01 AM