पुणे : जिल्ह्यातील शिक्षण संस्थांची व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम पुढील १५ दिवसांत द्या, असे आदेश राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. तसेच शिष्यवृत्तीच्या कामात दिरंगाई करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबीही कांबळे यांनी दिली.जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांची कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम समाजकल्याण विभागाने थकवली आहे. परिणामी शिक्षण संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे दिलीप कांबळे यांनी शासकीय विश्रामागृह येथे सर्व शिक्षण संस्थाचालक व प्राचार्यांची बैठक घेतली. यावेळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, पी. एस. कवटे, माधव वैद्य आदी उपस्थित होते.कांबळे म्हणाले, एकही मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच गेल्या तीन वर्षांतील शिष्यवृत्तीची रक्कम येत्या १५ दिवसांत देण्याची व्यवस्था करावी. तसेच पुढील महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यात एखाद्या अधिकाºयाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई करण्यास गय केली जाणार आहे.दरम्यान, समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्तीच्या रकमेचे असमान वाटप करण्यात आले असल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला. तसेच शिष्यवृत्ती वाटपासाठी रक्कम कमी पडणार नाही, याची शासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर सध्या पुणे जिल्ह्याकडे २५ कोटी रक्कम शिल्ल्क आहे. येत्या दोन दिवसांत आणखी ५० कोटी रुपये दिले जातील. तसेच शिष्यवृत्ती वाटपासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे कर्वे शिक्षण संस्थेसह आणखी काही संस्थांची शिष्यवृत्तीची रक्कम येत्या सोमवारी बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम १५ दिवसांत द्या- दिलीप कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:01 AM