उपमुख्यमंत्र्यांनी आयोगातील सदस्यांचे सर्व रिक्त पदे ३१ जुलैपूर्वी भरले जातील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर दिलेल्या वेळेत रिक्त पदे भरले गेलीच नाही. रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. सर्व रिक्त पदे भरले जातील अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात चार रिक्त पदांपैकी तीन रिक्त पदे भरल्याने एक अध्यक्ष व आधीचे एक सदस्य तर, नव्याने भरलेले तीन सदस्य असे एकूण पाच जण सध्या कारभार पाहत आहेत. मात्र, येत्या २९ ऑगस्ट रोजी अध्यक्ष निवृत्त होणार असल्याने पुन्हा दोन पदे रिक्त राहणार आहेत. मागच्या वेळी अध्यक्षपद सुमारे २ वर्ष रिक्त होते, याचा खूप मोठा फटका निर्णय प्रक्रियेवर झाल्याचे दिसून आले. यात उमेदवारांचे नुकसान होते. एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून या संस्थेचे अध्यक्षपद संवैधानिक आहे. या पदाचा अतिरिक्त कारभार सोपवून सरकार पुन्हा मागचीच री ओढताना दिसत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दे. बा. शिंदे यांच्याकडे एमपीएससीचा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:16 AM