संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 07:05 PM2020-05-09T19:05:02+5:302020-05-09T19:14:30+5:30

या उद्योगांना महाराष्ट्रात विशेषतः बारामती, इंदापूर या भागांमध्ये आणण्यासाठी शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुळे यांनी प्रयत्न करावेत..

Give Baramati MIDC land to industries who will left from China | संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे..

संकटात संधी मानुन चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे..

Next
ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांच्याकडे उद्योजकांची मागणीबारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी संवादकोरोना संक्रमणाला कारणीभुत ठरवत अनेक उद्योग चीनमधुन बाहेर पडण्याच्या तयारीत...

बारामती : कोरोना संक्रमणामुळे जगभरातील उद्योग ढासळले आहेत.अनेक उद्योग उद्धवस्त झाले आहेत.कोरोना संक्रमणाला कारणीभुत असल्याचा आरोप करीत अनेक उद्योग चीनमधुन बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. बारामतीच्या उद्योजकांनी संकटात ही संधी मानुन देशाने चीनमधुन बाहेर पडणाऱ्या उद्योगांचे स्वागत करावे. तेउद्योग बारामतीच्या रिकाम्या भूखंडात आणावे,अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन ने केली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधला.यावेळी असोसिएशनच्या वतीने ही मागणी करण्यात आली. बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, भारत फोर्जचे सुशांतपुस्तके, पियाजियोचे जगदीश गंधे, जीटीएन ईंजिनीयरींगचे  मिश्रा,डायनॅमिक्सचे जितेंद्र जाधव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जेजुरी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे आदीप्रमुख उद्योजक व पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झाले होते.लॉकडाऊनचा उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम, परप्रांतीय कामगार यांची मानसिकता व उपलब्धता, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्या करत असलेल्या उपाय योजना, महाराष्ट्र राज्यातील जादा वीजदर, तसेच लघुउद्योगांच्या अर्थकारणावर झालेला विपरीत परिणाम व इतर अनेक अनुषंगिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देश चीनमधील त्यांचे प्रकल्प बंद करून ते भारतात स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत, असे प्रकल्प महाराष्ट्रात विशेषतः बारामती, इंदापूर, फलटण, टेंभुर्णी, जेजुरी आदी ग्रामीण भागात आणण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुळे यांनी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यावी अशी आग्रही मागणी असोसिएशनचे अध्यक्ष जामदार यांनी या बैठकीतकेली.  तसेच लघू उद्योगांना त्यांनी वसूल केलेली जीएसटी ची रक्कम काही कालावधीसाठी बिनव्याजी वापरण्यास मिळावी, राज्य शासनाने कर्ज हमी घेऊन लघु उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशा अनेक मागण्या यावेळीकरण्यात आल्या.बारामती, जेजुरी, कुरकुंभ एमआयडीसी मधील उद्योगांच्यामागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवण्यासाठी  प्रयत्न केलाजाईल अशी ग्वाही ,यावेळी खासदार  सुळे यांनी दिली.

Web Title: Give Baramati MIDC land to industries who will left from China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.