पिंपरी : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल १ हजार ५०० कोटींची मदत केली आहे. देशावर ज्यावेळी संकट येईल, त्यावेळी ते मदतीसाठी सरसावले आहेत. पिंपरी - चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा हा मोठा उद्योग समूह आहे. त्यामुळे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव महापालिका महासभेत पारित केला असून राज्य आणि केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे.
पिंपरी - चिंचवड महापालिकेची तहवूष्ठब सभा झाली. या सभेत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव उपसूचनेद्वारे करण्यात आला. उपमहापौर तुषार हिंगे यांनी मांडलेल्या या उपसूचनेला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या उपसूचनेला एकमताने मान्यता देण्यात आली. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल १ हजार ५०० कोटींची मदत केली आहे. शिवाय मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणाठया वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करुन दिले. पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भरीव अशी मदत केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देशावर ज्या-ज्या वेळी संकटे आली अशा वेळेस सर्वतोपरी मदत केली आहे.टाटा उद्योग समूह हा पिंपरी - चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा मोठा उद्योग समूह आहे. टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून शहरातील अनेक तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. राज्य, केंद्र सरकारकडे यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे.