सध्या या योजनेनुसार जिल्ह्यातील ६३९ शिष्यवृत्तीधारकांना एकूण २८ लाख ७५ हजार ५०० रुपयांची तरतूद केली आहे. शिरूर तालुक्यातील सर्वाधिक २९७ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यापोटी १३ लाख ३६ हजार ५०० रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, माध्यमिक शाळेतील शिष्यवृत्ती मिळविलेल्या गुणवत्ताधारक मुलांचा या २९७ मुलांमध्ये समावेश नाही. याचाच अर्थ या मुलांना सायकल अनुदानपोटी प्रत्येकी साडेचार हजार रुपये मिळणार नाहीत. गुणवंत मुलांमध्ये असा भेदभाव व करता जिल्हा परिषदेने याही मुलांना अनुदान द्यावे, अशी मागणी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांकडून होत आहे. याबाबत शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम यांनीही निवेदनाद्वारे सर्व शिष्यवृत्तीधारक मुलांना अनुदान मिळावे अशी आग्रही मागणी केली आहे.
माध्यमिक शाळांमधील विद्यार्ध्यांना पण सायकल अनुदान द्या : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:10 AM