शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Exclusive: पुणेकरांना सर्वात आधी द्या कोरोना लस; मोदी सरकार घेणार का 'त्या' पत्राची दखल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:23 AM

पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोव्हिड रिस्पाॅन्सची मागणी; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना लिहिलं पत्र

पुणे: पुण्यातल्या कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता पुणेकरांचे सर्वात आधी लसीकरण (Corona Vaccine to Pune Residents) करण्यात यावे अशी मागणी पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोव्हिड रिस्पाॅन्सच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांना त्यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे. कोरोना पुण्यामध्ये सर्वाधिक पसरला असताना सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन शासकीय अधिकारी, शहरातील सर्व प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातल्या एमसीसीआयएचे मेंबर्स यांनी समन्वयासाठी या गटाची स्थापना केली होती. कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

गेल्या काही दिवसांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आता या गटाच्या वतीने आता ही मागणी करण्यात आली आहे. पुण्यात पाॅझिटिव्हिटी रेट १०% वर गेला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होते आहे. हे लक्षात घेता ही मागणी करण्यात आली असून यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची वेळही मागण्यात आल्याचे पुणे प्लॅटफॉर्म फाॅर कोव्हिड रिस्पाॅन्सचे प्रमुख सुधीर मेहता यांनी सांगितले. 

सीरम इन्स्टिट्यूट (serum institute) या पुण्यातल्या कंपनी कडून कोव्हिडची लस तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडे याचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे या लशींचा वापर करुन लसीकरण करण्यात यावे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. चिंताजनक! भारतात कोरोनाची लस दिल्यानंतर २७ लोकांचा मृत्यू; आरोग्यमंत्रालयानं सांगितले की...

लोकमतशी बोलताना मेहता म्हणाले “ पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच सरकारने ठरवलेल्या क्रमानेच मात्र वेगाने पुणेकरांचे लसीकरण करण्यात यावे अशी आमची भूमिका आहे. पुढील तीन महिन्यात जर हे लसीकरण पूर्ण झाले, तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळू शकतो. सीरमकडे लस शिल्लक आहे आणि ती पुण्यातच आहे. त्यामुळे पुणेकरांचे लसीकरण पूर्ण करावे असे आमचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले असून चर्चा करणासाठी त्यांची वेळही मागितली आहे.”

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस