कळस (जि. पुणे) : दूध पावडरसाठी तीन रुपये अनुदान देण्याची शासनाने तयारी दर्शविली असली, तरी कर्नाटक शासनाने ज्या प्रमाणे प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, तोच निर्णय महाराष्ट्रात राबविण्यात यावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.कळस (ता. इंदापूर) येथील नेचर डिलाईट डेअरीला शरद पवार यांनी भेट दिली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, ‘‘सरकारने हमीभाव निश्चित केला; पण बाजारपेठेत तेवढा दर नसल्याने हमीभाव देणे शक्य नाही. यावर शासनाने सर्व दूध खरेदी करून २७ रुपयांप्रमाणे पैसे उत्पादकांना द्यावेत. मात्र, शासन तसे करत नाही. सहकारी व खासगी संघाला दूध खरेदी करावे लागत आहे. भारत दूध उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र, दूधवाढीसाठी नेदरलँडसारखे तंत्रज्ञान अवगत करावे लागणार आहे. दूध संघांनी पॅकिंग करून दूध विकल्यास नुकसान कमी होईल.’’
दूध उत्पादकांना ५ रुपये थेट अनुदान द्या - पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 5:10 AM