शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

परतावा म्हणून सपाट जमीन द्या!

By admin | Published: September 02, 2016 5:32 AM

खेड सेझमधील १५ टक्के परताव्याचा तिडा सुटताना दिसत नाही. सेझने शेतकऱ्यांना डोंगरदरीतील जमिनीला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे. ‘परताव्याची जमीन द्यायची, तर सलग

दावडी : खेड सेझमधील १५ टक्के परताव्याचा तिडा सुटताना दिसत नाही. सेझने शेतकऱ्यांना डोंगरदरीतील जमिनीला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे. ‘परताव्याची जमीन द्यायची, तर सलग व सपाट जमीन द्या . शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय परताव्याची जमीन परस्पर शासनाने ठरवू नये,’ अशी मागणी सेझबाधित शेतकऱ्यांनी केली आहे.बुधवारी मुंबई येथे १५ टक्के परताव्यासंदर्भात बैैठक झाली. यात शेतकऱ्यांनी ही मागणी केली. दावडी, निमगाव, गोसासी, कनेरसर, केंदूर या गावांतीत सेझबाधित शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य औद्यागिक क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेटी, पुण्याचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जागेत दोन ठिकाणी १५ टक्के परताव्यांची जमीन देऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी सुचवलेली जमीन मुळातच डोंगरदऱ्यातील असल्यामुळे शेतकऱ्यांनी या जमिनीला नापंसती दर्शविली. परतांव्याची ४५० एकर जमीन सलग व सपाट जमीन शेतकऱ्याच्या पसंतीने द्या. त्या वेळी विकसनासाठी कपात करण्यात आलेले ५८ कोटी रुपये व्याजासह परत करा. नाहीतर परताव्याची ४५० एकर अविकसित जमीन सेझने चालू बाजारभावाच्या चार पट्टीने घ्यावी, अशी मागणी केली. गेली आठ वर्षे प्रलंबित असलेला परतांव्याचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना त्यातून मुक्त करावे; अन्यथा या ठिकाणी कुठलाही प्रकल्प आम्ही होऊ देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी काशिनाथ दौैंडकर, मारुती गोरडे, बाळासाहेब माशेरे, राजाराम गोरडे, धोडिंभाऊ साकोरे, मारुती सुके, संतोष आरुडे, काशिनाथ हजारे, विष्णू हजारे उपस्थित होते. (वार्ताहर)दावडी, निमगाव, कनेरसर , केंदूर या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे पथक येणार आहे. त्यांना ही सेझ बाधित शेतकरी भेटून १५ टक्के परताव्याबाबत विचारणा करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.