खळद/नारायणपूर : मोदी सरकारने साखरेचे अनुदान बंद केल्याने उसाची शेती तोटय़ात चालली आहे. सोयाबीन व कांदा यांचेही भाव गडगडले असून, शेतक:यांचे कंबरडे मोडण्यास मोदी सरकार जबाबदार आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा व लष्करी जवानांचा बळी गेला आहे. या देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही अन् मोदी महाराष्ट्राच्या गल्लीबोळांत सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवून राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत द्या व पुरंदरमधून कार्यक्षम अशोक टेकवडे यांना निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक टेकवडे यांच्या प्रचारार्थ सासवड येथे शरद पवार यांची सभा झाली. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका केली. देशात आघाडीचे शासन असताना कृषिमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर सत्तेचा अधिकार जनतेच्या हितासाठी वापरून 7क् हजार कोटींची कर्जमाफी, पीककर्जाचा व्याजदर 12 टक्क्यांवरून एक लाखार्पयत क् टक्के इतका कमी करणो, शेतमालाला बाजारभाव देणो, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
आजही देशातील 66 टक्के लोक शेती व्यवसायातून 1क्क् कोटींपेक्षा जास्त लोकांच्या अन्नाची गरज भागवतात; परंतु मोदी सरकार त्यांच्या शेतमालाला बाजारभाव देत नसेल, त्यांच्या हिताचे निर्णय घेत नसेल, तर त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच, ‘पवार सरंक्षणमंत्री असताना सीमेवर कधी गेले होते का?’ या मोंदीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘दोन-अडीच वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या सर्व सीमांना भेट देऊन जवानांना विश्वास देण्याचे काम केले आहे.’’ मोदी हे भाषणातून गुजरात पुढे असल्याचे सांगतात, याबाबत पवार यांनी सांगितले, की महाराष्ट्र कृषी, शिक्षण, औद्योगिक, आरोग्य या व अन्य क्षेत्रंत देशात अव्वल आहे. या वेळी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, अशोक ओव्हाळ, गौरी कुंजीर, सारिका इंगळे, दिलीप बारभाई, प्रमोद जगताप, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथे, मानसी जगताप, योगेश फडतरे, राहुल शेवाळे, राहुल चोरघडे, माणिकराव झेंडे, अंजना भोर उपस्थित होते. (वार्ताहर)
4पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक टेकवडे यांच्या प्रचारार्थ सासवड येथे शरद पवार यांची सभा झाली. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका केली. देशात आघाडीचे शासन असताना कृषिमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर सत्तेचा अधिकार जनतेच्या हितासाठी वापरून 7क् हजार कोटींची कर्जमाफी, पीककर्जाचा व्याजदर 12 टक्क्यांवरून एक लाखार्पयत क् टक्के इतका कमी करणो, शेतमालाला बाजारभाव दिले.
4पवार सरंक्षणमंत्री असताना सीमेवर कधी गेले होते का?’ या मोंदीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘दोन-अडीच वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या सर्व सीमांना भेट देऊन जवानांना विश्वास देण्याचे काम केले आहे.’’ मोदी हे भाषणातून गुजरात पुढे असल्याचे सांगतात, याबाबत पवार यांनी सांगितले, की महाराष्ट्र कृषी, शिक्षण, औद्योगिक, आरोग्य या व अन्य क्षेत्रंत देशात अव्वल आहे. यासाठी मोदींनी महाराष्ट्र व गुजरातच्या विकासाची टिप्पणी काढावी, याचे उत्तर त्यांना आपोआप मिळेल.