पुणे : बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा सी समरी अहवाल (सी समरी रिपोर्ट) पाठविणाऱ्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.दाभोलकर यांच्या पुढाकारातून अंनिसने बोगस डॉक्टर विरोधी मोहीम उघडली होती, शहरातील अनेक बोगस डॉक्टरांविरूद्ध दाभोलकर यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. पालिकेने धनसिंग चौधरी यांच्या विरोधात १८ आॅक्टोबर २०१३ रोजी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल केला. हा खटला सुरू असताना पालिकेचे सहायक अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी या गुन्ह्यामध्ये तथ्य नसल्याचा सी समरी रिपोर्ट १९ एप्रिल २०१६ रोजी न्यायालयामध्ये सादर केला. उच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरू असताना ही बाब उजेडात आली. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व बोगस डॉक्टरविरोधी समितीला अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. (प्रतिनिधी)
दाभोलकरांची तक्रार खोटी ठरविणाऱ्यांना नोटीस द्या
By admin | Published: April 22, 2017 1:35 AM