पिंपरी : प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी महापालिकेने नवीन उपक्रम राबविला आहे. पाच बाटल्या जमा करणाऱ्याला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणाऱ्याला एक वडापाव देण्यात येणार आहे. शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेते यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक शीतपेये अथवा पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून रिकाम्या बाटल्या इतरत्र टाकतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. यामुळे पर्यावरणाचीही हानी होते. याकरिता महापालिकेने प्रोत्साहनपर अनोखा प्लास्टिक व्यवस्थापन उपक्रम राबविला आहे. त्या मोबदल्यात बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला चहा, नाष्टा, जेवण या स्वरूपात मोबदला देण्याचा उपक्रम महापालिकेने राबवायचे ठरवले आहे. पाच बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला एक वडापाव संबंधित हॉटेल व्यावसायिक अथवा विक्रेत्याने द्यावयाचा आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक शीतपेये अथवा पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून रिकाम्या बाटल्या इतरत्र टाकतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. यामुळे पर्यावरणाचीही हानी होते. याकरिता महापालिका प्रोत्साहनपर उपक्रम राबवित आहे.
हॉटेल मालकाला १५ रुपये मिळणार
''महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आरोग्य मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे नोंदणी करून अर्ज सादर करता येणार आहे. नोंदणी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेत्याकडे अधिकृत अन्न परवाना तसेच व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे राहणार आहे. प्लॅस्टिकच्या पाच बाटल्या जमा करणाऱ्याला एक कप चहा मिळणार आहे. विक्रेते, हॉटेलचालकाला १० रुपयांचा मोबदला देणार आहे. तर, दहा बाटल्या जमा केल्यास एक वडापाव दिला जाणार आहे. त्यापोटी महापालिका हॉटेल मालकाला १५ रुपये देणार आहे. शहरात सगळीकडे हा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.''