शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

विद्यार्थ्यांच्या संशोधन दृष्टीला वाव द्यावा

By admin | Published: January 11, 2017 3:45 AM

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व नवनिर्मितीला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आविष्कारसारख्या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा जिंकणे हा विद्यापीठाचा उद्देश असला

पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व नवनिर्मितीला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आविष्कारसारख्या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा जिंकणे हा विद्यापीठाचा उद्देश असला, तरीही विद्यार्थ्यांच्या संशोधन दृष्टीला वाव मिळणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा नुकुतीच पार पडली. त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांसाठी आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. गाडे बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, आविष्कार स्पर्धेचे समन्वयक डॉ. रवींद्र जायभाये, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते.मोहन खोंड म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढत चालली असून पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जानिर्मिती तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोगांचे निदान शोधण्याबाबतचे प्रकल्प विद्यार्थी सादर करीत आहेत.’’४८ प्रकल्पांची होणार निवड४राज्यातील विद्यापीठांमधील व महाविद्यालयांंमधील विद्यार्थी व प्राध्यापकांनी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प तयार करावेत, तसेच संशोधन क्षेत्रात योगदान द्यावे, या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४यंदा राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा येत्या २७ ते २९ जानेवारी या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थ्यांचे प्रकल्प निवडले जाणार आहेत. मंगळवारी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अ‍ॅग्रिकल्चर, मेडिकल- फार्मसी या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प स्पर्धेत सादर करण्यात आले.