पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याच्या हेतूने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सन २००६ मध्ये तब्बल ९ लाख ४८ हजार रुपये खर्च करून ज्वेलरी डिझाइन मशिनरी खरेदी केली. हे प्रशिक्षण घेण्यासाठी देशात विद्येचे माहेरघर म्हणून बिरुदावली मिळविणाºया पुणे शहरात एकही प्रशिक्षक मिळू शकले नाही. यामुळे तब्बल दहा वर्षांपासून लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या मशिनरी धूळ खात पडून आहेत. आता ही मशिनरी दुरुस्त करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्वेलरी डिझाईन प्रशिक्षण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तत्कालीन महापालिका आयुक्त व सह महापालिका आयुक्त यांनी मुंबईस्थित इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी येथील संस्थेला भेट दिली. त्यानंतर पुणे मपाहालिकेच्या वतीने शहरातील आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने खास ज्वेलरी डिझाइन प्रशिक्षण धोरण तयार केले.यामध्ये ज्वेलरी डिझाइन प्रशिक्षण, ज्वेलरी फिनिशिंग,ज्वेलरी कास्टिंग, ज्वेलरीमेकिंग, कारागिरी आदीविविध प्रकारची प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेली मशिनरी खरेदी करण्यात आली.- मशिनरी खरेदी केल्यानंतर महापालिकेच्या वतीने संगणक आधारित ज्वेलरी डिझाइन प्रशिक्षण, ज्वेलरी फिनिशिंग, ज्वेलरी कास्टिंग, ज्वेलरी मेकिंग, कारागिरी अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ प्रशिक्षक, अभ्यासक्रमाची रूपरेषा, प्रशिक्षणाचे मूल्यांकन करणारी व्यवस्था व या क्षेत्रातील उद्योजकांची मान्यता असणारे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था न झाल्याने तब्बल गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या ज्वेलरी डिझाइन मशिनरी वापराविना पडून असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.- महापालिकेच्या समाज विकास विभागाने आता या मशिनरीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व मशिन दुरुस्त करून चालविण्यास योग्य स्थिती आल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राला कोणताही मोबदला नघेता चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु या मशिन दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी देण्यासाठी हा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
ज्वेलरी डिझायनिंगची लाखो रुपयांची मशिनरी पडून, पुणे विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्राला देण्याची सुचली उपरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:19 AM