शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

पांजरपोळमुळे १२०० भाकड जनावरांना जीवदान

By admin | Published: October 27, 2016 5:05 AM

येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट गेल्या १५० वर्षांपासून निकामी झालेल्या भाकड गायीचा सांभाळ करते. बुधवारी (दि. २६) वसुबारसनिमित्ताने येथील ७०० गायींची पूजा करण्यात आली.

भोसरी : येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट गेल्या १५० वर्षांपासून निकामी झालेल्या भाकड गायीचा सांभाळ करते. बुधवारी (दि. २६) वसुबारसनिमित्ताने येथील ७०० गायींची पूजा करण्यात आली. या वेळी परिसरातील नागरिकांनी येथील तब्बल १२०० जनावरांसाठी गूळ फुटाणे व हिरवा चारा दान केला. पुणे पांजरपोळ ट्रस्टने आजपर्यंत हजारो भाकड गायी व इतर जनावरांना जीवदान दिले आहे. सन १८५५मध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे. आज संस्थेकडे भोसरी येथे ७०० गायी, ३७० बैल, ७० म्हशी, व ६० रेडे अशी एकूण १२०० भाकड जनावरे आहेत. बेकायदेशीररीत्या कत्तलखान्याकडे नेली जाणारी जनावरे पोलिसांनी वेळोवेळी पकडून संस्थेकडे दिली आहेत. अशी जनावरे मिळवण्यासाठी संस्था कायदेशीर लढाई लढते व जास्तीत जास्त जनावरांना जीवदान देण्याचा प्रयत्न करते. भोसरी येथे संस्थेची एकूण १२ एकर जागा आहे, त्यातील ६ एकर जागेवर १० गोठे, कृमी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, सभागृह, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यात आली आहे. समाजातील दानशूर नागरिक वेळोवेळी संस्थेला आर्थिक व जनावरांना चाऱ्याच्या रूपाने देणग्या देत असतात. या देणग्यांमधूनच संस्थेचे खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व जनावरांच्या संगोपनासाठी व उपचारासाठी लागणारे पैसे खर्च होतात. संस्थेत या जनावरांच्या संगोपनासाठी ५० कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. ओमप्रकाश रांका हे संस्थेचे अध्यक्ष असून, एकूण १२ सदस्य व्यवस्थापकीय मंडळात आहेत. (वार्ताहर)पुणे पांजरपोळ ट्रस्ट गोपालन धाम या संस्थेचे मुख्य काम हे समाजातील अनाथ व भाकड जनावरांना जीवदान देऊन त्यांचे योग्य संगोपन करणे हे आहे. तसेच गोहत्या थांबवण्यासंबंधी जनजागृती करण्याचे कामही संस्था करते. त्यात कोणताही आर्थिक स्वार्थ नसून, येथे येणाऱ्या प्रत्येक जनावराची नि:स्वार्थ भावनेने काळजी घेतली जाते. जनावरांचे खरे महत्त्व समाजाला कळणे गरजेचे आहे. गोहत्येविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे गरजेचे आहे. जो गरीब शेतकरी आपली जनावरे पोसू शकत नाही, त्यांनी आपली जनावरे संस्थेकडे सोपवावी. पण, शुल्लक पैशांसाठी त्यांना कसायाच्या स्वाधीन करू नये. - विनोद पालोरकर (व्यवस्थापक, पुणे पांजरपोळ ट्रस्ट, भोसरी)