खोरमध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून चार खासगी मोटारीतून पाणी उपसा सुरु असतानाही त्यांच्यावर खोर ग्रामपंचायत मेहरबान झाली असल्याचे दिसते. अतिक्रमण असतानाही या लोकांना पाठिशी घालत त्यांच्यावर कारवाई करण्यास ग्राविकास अधिकारी विलंब करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेली कित्येक वर्षे हे अतिक्रमण असतानाही त्यांना साधी सूचनादेखील करण्याचे धाडस प्रशासनाने केले नाही. ग्रामस्थांनी आवाज उठवण्यास सुरुवात केल्याने ग्रामपंचायतीने संबंधितांना मोटारी काढण्याच्या नोटीसा पाठवल्या मात्र, यातील एकानेच मोटार काढली आहे. उर्वरीत मोटारी आहे त्या ठिकाणीची आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत प्रा डॉ अशोक शिंदे म्हणाले की, जर शासन या अतिक्रमण बाबत जर असमर्थन दाखवीत असेल व निष्काळजीपणा करीत असेल तर आम्ही बक्षीस पत्र करून दिलेल्या जागेच्या विहिरीवर आम्ही आमचा ताबा घेऊन हे पाणी शेतीसाठी वापरण्यात येईल.
दरम्यान, गटविकस अधिकारी अजिंक्य येथे यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, या सर्व प्रकाराची माहिती घेऊन या मोटारी काढण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात येईल. जर मोटारी निघाल्या नाहीत तर संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
०१ खोर