शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

जातीवाचक उल्लेख करून युवकाच्या डोक्यात गजाने वार

By admin | Published: June 29, 2017 3:33 AM

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या पाळण्यात मागासवर्गीय युवकांना बसण्याचा मज्जाव करुन जातीवाचक उल्लेख

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या पाळण्यात मागासवर्गीय युवकांना बसण्याचा मज्जाव करुन जातीवाचक उल्लेख करुन डोक्यात कोयत्याने, गजाने वार केले. पिस्तूल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार काल (दि.२७) रात्री इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गणेश बाळू पवार, दुर्गा पवार,विवेक चौगुले, अमर मिसाळ, भैय्या वायदंडे, राहूल बाळू पवार (सर्व रा. वडारगल्ली, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे व अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. चेतन अनिल ढावरे (रा. लोकशाहिर अण्णाभाऊ साठेनगर, इंदापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. तो आणि त्याचा भाऊ विवेक ढावरे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पालखी सोहळ्या निमित्त भार्गवराम बगिचा शेजारच्या टाऊन हॉल समोरच्या पटांगणात यांत्रिक पाळणे आले आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फियार्दी चेतन हा पाळण्यामध्ये बसण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्यास अडवले. पाळण्यात बसायचे नाही असे म्हणत, जातीवाचक उल्लेख करत आरोपी गणेश पवार याने हातातील कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला. दुर्गा पवार गजाने डोक्यातच मारहाण केली. हा प्रकार पाहून फिर्यादीचा भाऊ विवेक फिर्यादीला सोडविण्यासाठी मध्ये आला. तेव्हा आरोपींनी त्याला ही गज, कोयता व लाथाबुक्यांनी मारहाण केली. दुर्गा पवारने त्याच्या जवळचे पिस्तुल फिर्यादीवर रोखले. गोळ्या घालण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फियार्दीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.