बारामती : आदिवासी समाजाच्या वतीने देसाई इस्टेटमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आदिवासी क्रांतिकारक तसेच महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोरोनाकाळात तसेच अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुक्ता आंभेरे, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहराची कार्याध्यक्ष विशाल जाधव होते. प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र वळवी तर बारामती तालुका प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शंकर घोडे उपस्थित होते. या वेळी दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांसह श्रेया रनमोळे या एमबीबीएस प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रकाश कोकणे यांनी, तर स्वागत गणपत जाधव यांनी केले. आभार मीननाथ काटे यांनी मानले.