याप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, वनसंरक्षक अधिकारी रंगनाथ नाईकडे, मानीनी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भरती चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांना नोव्हेंबर २०२६ साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ग्रासले होते. हृदयात ब्लॉकेज झाल्याने त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी सारखी सर्जरी करण्यात आली होती. मात्र, अशा जीवघेण्या आजारातून बरे होऊन अवघ्या अठरा महिन्यांत त्यांनी चार अतिउच्च हिमशिखरे सर केली. यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय तर कंचनगंगासारख्या शिखराचा समावेश आहे. स्पोर्टस क्लायंबिंगमध्ये त्यांनी राष्ट्रीय विजेते खेळाडू घडविले आहेत. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय गिर्यारोहक ठरले आहेत.
२८ शेलपिंपळगाव ढोकले
मुंबईत शिखरवीर कृष्णा ढोकले यांना ग्लोबल चेंज मेकर्स हा पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.