शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 8:46 PM

आषाढी पायीवारी : जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !!

भानुदास पऱ्हाड, लोकमत न्यूज नेटवर्क, आळंदी : अवघाचा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक!! जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!!,  श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. सायंकाळी सातच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे.

प्रस्थान सोहळ्यास शनिवारी (दि.२९) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरु झाली. दुपारी दोन वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. यावेळी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे सायंकाळी साडेसहा वाजता ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर विना मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.

तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ - मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा - तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आंनदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेली महिला वारकरी आणि यामध्ये सहभागी झालेले तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला. सायंकाळी उशिरा हा वैभवी सोहळा भरावरस्तामार्गे, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वारचौकातून दर्शन मंडप इमारतीत पहिल्या मुक्कामासाठी विसावला. 

इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री प्रस्थान सोहळ्याला....आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्याला दाखल झाले. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना तर अजित पवार उपमुख्यमंत्री असताना प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एकत्रित फुगडी खेळली. 

प्रस्थान सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, बंडू जाधव, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त भावार्थ देखणे, तहसीलदार प्रशांत बेडसे, मालक बाळासाहेब आरफळकर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदिंसह मानकरी व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

विदर्भ, मराठवाड्यात वेळेत पाऊस झाल्याने बहुधा पेरण्यांची कामे उरकली आहेत. त्याचा परिणाम आषाढी पायवारीत भाविकांच्या वाढत्या संख्येवर दिसून आला. पेरणीनंतर अनेक जण आषाढी वारीत सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत लोकमत प्रतिनिधीशी बोलताना विदर्भातील वारकरी गजानन जोगदंड म्हणाले, वारी हा अविभाज्य घटक आहे. आमच्या जीवनात वारीला फार महत्त्व आहे. मात्र वेळेत पाऊस जर झाला नाही तर आम्हाला इच्छा असूनही वारीत सहभागी होता येत नाही. मात्र यंदा वेळेत पाऊस झाल्याने आम्ही पेरणीची कामे उरकून आनंदाने वारीत सहभागी झालो आहोत. आता पंढरपूरपर्यंत आम्ही पायीवारी सोबत जाणार असून लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे.

-  घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ.-  धार्मिक वातावरणात व चैतन्यमय भक्तिरसात अलंकापुरी चिंब.-  प्रस्थान सोहळ्यासाठी जमला वैष्णवांचा अलोट भक्तिसागर.-  पोलिसांचा कडेकोट चोख बंदोबस्त.-  अलंकापुरी पताकांनी भगवीमय.-   फेर, फुगड्या... अन अभंग इंद्रायणी काठावर रंगला भक्तांचा आनंदमेळा.

टॅग्स :sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरAlandiआळंदीPandharpurपंढरपूर