शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अलंकापुरीत रंगली ‘श्रीं’ची वैभवी मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 2:07 AM

हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा पूजा करून रथोत्सव हरिनामाच्या गजरात प्रथापरंपरांचे पालन करीत साजरा झाला.

आळंदी : विणा, टाळ, मृदंगाच्या त्रिनादासह ‘माऊली- माऊली, श्री विठ्ठल- श्री विठ्ठल, ज्ञानोबा माऊली- तुकाराम’ अशा नामगजरासह जयघोष करीत मंगळवारी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा पूजा करून रथोत्सव हरिनामाच्या गजरात प्रथापरंपरांचे पालन करीत साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा ‘पुंडलीका वरदे हरी विठ्ठल...’चा नामजयघोष झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे हात ‘श्रीं’च्या रथोत्सवातील रथ ओढण्यास सरसावले.ज्ञान-भक्ती-चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीने नगरप्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘श्रीं’चे दर्शन घेत भाविकांनी रथ हाताने ओढत आपली सेवा दिली. तत्पूर्वी, ‘श्रीं’ची पालखी मंदिरातून खांद्यावर घेत रथोत्सवास गोपाळपुरात परंपरेने नामगजरात आणण्यात आली.द्वादशी दिनी मंगळवारी (दि. ४) दुपारी ‘श्रीं’च्या महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. ‘श्रीं’चा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले. तत्पूर्वी, मंदिरात ‘श्रीं’ना पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाली. परंपरेने खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांच्या हस्ते पंचोपचार पूजा झाली. या वेळी तहसीलदार सुचित्रा आमले, मंडलाधिकारी चेतन चासकर, मुख्याधिकारी समीर भूमकर आदी उपस्थित होते.द्वादशीला दुपारी ४च्या सुमारास ‘श्रीं’चा चांदीचा वैभवी मुखवटा फुलांनी सजलेल्या चांदीचे पालखीत पूजा बांधित विराजमान करण्यात आला. ‘श्रीं’ची पालखी खांद्यावर घेत महाद्वारातून शनिमंदिरमार्गे गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात आली. श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने ‘श्रीं’ची विधिवत पूजा झाली.रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील, विश्वस्त अभय टिळक, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर, मानकरी व्यवस्थापक माउली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक राहुल जाधव, उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक, ‘श्रीं’चे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब कुºहाडे, योगेश आरू, भीमराव घुंडरे, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, ‘श्रीं’चे मानकरी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.संत ज्ञानेश्वरमहाराज यांचा ७२३वा संजीवन समाधी दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरांचे पालन करीत बुधवारी अलंकापुरीत साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील धर्मशाळांसह माऊली मंदिर, इंद्रायणी नदीघाटावर ‘श्रीं’च्या संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होणार आहे. तत्पूर्वी, माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते ‘श्रीं’ना पवमान अभिषेक व दुधारती होईल. भाविकांच्या महापूजा व संत नामदेवराय यांच्या वतीने ‘श्रीं’ना नामदासमहाराज परिवाराच्या वतीने महापूजा होईल. विणामंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तनसेवा रुजू होईल. सकाळी दहा वाजता नामदासमहाराज यांचे वंशपरंपरेने ‘श्रीं’च्या संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन होणार आहे. दरम्यान, महाद्वारात काल्याचे कीर्तन, त्यानंतर श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराच्या सुमारास ‘श्रीं’च्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षाव, आरती व घंटानाद होणार आहे. या वेळी उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसादवाटप व महानैवेद्याने भाविकांना दर्शनासाठी ‘श्रीं’चा गाभारा खुला होईल. सोपानकाका देहूकर यांच्या वतीने विणामंडपात कीर्तन, त्यानंतर हैबतरावबाबा यांच्या वतीने हरिजागर होणार असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.पूजेच्या काळात परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी ‘श्रीं’चे रथोत्सवात सहभागी होण्यास जमले. ‘श्रीं’ची पूजा होताच माऊलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी रथात ठेवण्यात आला. दरम्यान, ‘श्रीं’चे रथोत्सवास रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकºयांच्या दिंडीतून भगव्या पताका उंचावून ‘माऊली-माऊली’चा गजर करीत रथोत्सव सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी चौक मार्गे हरिनाम गजरात झाली. मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली. मंदिर प्रदक्षिणा, धूपारती झाली. दरम्यान मंदिरात विणामंडपात हरिभाऊ बडवे, केंदूरकरमहाराज यांच्या वतीने परंपरेने कीर्तन सेवा झाली. कीर्तनानंतर ‘श्रीं’च्या गाभाºयात निमंत्रित खिरापत प्रसाद, प्रसाद वाटप विणा मंडपात, फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले.