मुख्याध्यापक जाधव यांचा गौरव करताना आमदार बेनके म्हणाले, ‘‘जाधवसरांनी ३८ वर्षांच्या कालखंडात अनेक विद्यार्थी घडविले. ते उच्च पदावर आहेत. शैक्षणिक वाटचालीत त्यांना तालुका व जिल्हा पातळीवरील आदर्श, गुणवंत व राज्यपातळीवर गुणवंत कर्तृत्ववान आदर्श मुख्याध्यापक हे पुरस्कार मिळाले आहेत. त्याना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.’’
मुख्याध्यापक जाधव यांना मंडळ ग्रामस्थ यांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती देऊन आमदार व अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापक जाधव यांनी सत्काराला उतर दिले.
या कार्यक्रमासाठी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सा. का. चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र नलावडे, शिवाजीराव नलावडे, सरपंच सुधाकर नलावडे, अश़ोकराव मुंढे, के. टी. नलावडे, शशिकांत नलावडे, विष्णुपंत नलावडे, जि. प. सदस्य भाऊ देवाडे, जिल्हा पातळीवरील शिक्षक, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, तालुक्यातील मुख्याध्यापक, निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र नलावडे यांनी केले. समीर वामन यांनी सूत्रसंचालन केले, दत्तात्रय मुंढे यांनी आभार मानले.
आमदार अतुल बेनके बोलताना व उपस्थित मान्यवर.