एच ई एम आर एल संरक्षक भिंत व महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत सकाळी साडेसातच्या दरम्यान नागरिकांना रानगाव्याचे दर्शन झाले. यानंतर लगेचच वनविभाग व पोलीस यांना स्थानिक नागरिकांनी याची कल्पना दिली.
महामार्गालगत भाग संरक्षित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले. तसेच रेस्क्यू टीमचे कार्यकर्तेदेखील पाचारण करण्यात आले होते.
रानगवा पाषाण तलावाकडे जाऊ नये. यासाठी तलावाच्या पुलाखाली जाळी व पत्रे लावून हा परिसर बंद करण्यात आला होता.
यानंतर रानगवा त्याच्या नैसर्गिक वाटेने जात होता. परंतु बघ्यांच्या गर्दीमुळे व रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या प्राणी मित्र यांच्या अनुभवाच्या कमतरतेमुळे गवा पुन्हा महामार्गालगत असलेल्या संरक्षक भिंती कडे वळाला.
यानंतर स्थानिक प्राणीमित्र व गोपालक यांच्या मदतीने वाटा शोधण्याचे काम करण्यात आले. एच ई एम आर एल च्या डोंगरा जवळील संरक्षक भिंतीचे काम चालू असलेल्या ठिकाणावरून रान गवा बाहेर आला असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. रानगवा ज्या ठिकाणावरून बाहेर आला होता त्या ठिकाणी त्याचे पायाचे निशान देखील स्पष्ट पहायला मिळत होते.
रानगव्याला एच ई एम आर एल मध्ये गेटमधून प्रवेश देण्यासाठी संरक्षण खात्याच्या परवानगीसाठीदेखील प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येत होते.
काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात एका रानगव्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्याापुढे गवा सुखरूप त्याच्या अधिवासामध्ये सोडण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात एका रानगव्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर वनविभागापुढे गवा सुखरूप त्याच्या अधिवासामध्ये सोडण्याचे आव्हान निर्माण झाले होते.